बालाजी तोरणे अहमदपूर व चाकूर तालुका.
अहमदपूर : कोरोना व्हायरस संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने बाजारपेठा, शाळा, महाविद्यालय, कार्यालय, वाहतूक व्यवस्था बंद केली असून संचारबंदी आदेश लागू केल्यामूळे कर्तव्यावर असलेले वाहक चालक गेल्या पाच दिवसापासून अहमदपूर आगारामध्ये आहेत. त्यामूळे त्यांना जेवणाची व्यवस्था नसल्यामूळे एस.टी. महामंडळाच्या वाहक, चालक व पोलीस कर्मचारी यांना शिवसेनेच्या वतीने अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.
सविस्तर माहिती अशी की, कोरोना व्हायरसला रोकण्यासाठी शासनाला संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या संचारबंदी आदेश लागू झाल्यामूळे कर्तव्यावर असलेले अनेक डेपोचे चालक वाहक अहमदपूर आगारामध्ये आहेत. असे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांना कळाल्यानंतर आगारातील चालक, वाहक व कर्मचारी यांना पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था केली. तसेच कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना ही अल्पोपहार देण्यात आले.त्यामूळे त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.
यावेळी व्यंकट नलवाड, शहरप्रमुख भारत सांगवीकर, बाळू मद्देवाड, अजित सांगवीकर, प्रदिप वट्टमवार सुनील हालसे,राजु सांगवीकर, सचिन सांगवीकर. सुनील बिराजदार, ऋशिकेष हालसे,रवि नखाते, गणेश बेंबळकर, बालाजी काळे, गोविंद काळे यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.