विवेक पंडित यांच्या संवेदनशीलतेमुळे ३०० परप्रांतीय मजुरांना मिळाला आसरा…

मुंबई दि. २७ मार्च

पोटाची खळगी भरण्यासाठी देशाच्या विविध प्रांतातून आलेले स्थलांतरित मजूर लोक डाऊन मुळे मुंबईतच अडकून पडले आहेत. कोरोनाच्या भीतीने आपापल्या गावाला जायला निघालेले जवळपास ३०० मजूर लोकमान्य टिळक टर्मिनसहून ट्रेनने निघणार होते. मात्र लॉक डाऊन तसेच रेल्वेसेवा बंद झाल्यामुळे हे सर्व कामगार लोकमान्य टिळक टर्मिनस येथेच अडकले होते. त्यांना खायची प्यायची कुठलीही सोय उपलब्ध नव्हती. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती, मात्र या कामगारांच्या व्यथा श्रमजीवी संघटनेचे संस्थापक श्री विवेक पंडित यांना कळताच त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून पोलिस व लोकप्रिनिधींच्या सहकार्याने सर्व कामगारांना निवारा आणि अन्नाची सोय करण्यात आली.

कॉरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने देशभरातील रेल्वेसेवा बंद केली. मात्र मुंबईत उपजिविकेसाठी रोजंदारीवर आलेल्या उत्तरप्रदेश, बिहार, तेलंगण, आंध्र प्रदेश, राजस्थान अशा देशाच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या मजुरांची गावाकडे जाण्याची धडपड व्यर्थ ठरली. कोरोनाच्या भीतीने आपापल्या गावाला जायला निघालेले १२० एकटे पुरुष आणि ४०-४२ कुटुंब असे जवळपास ३०० मजूर लोकमान्य टिळक टर्मिनसहून ट्रेनने निघणार होते.

मात्र ऐनवळी रेल्वेसेवा बंद झाल्यामुळे सर्व कामगार अडकून पडले, शिवाय लोकमान्य टिळक टर्मिनसच्या आवारात प्रतिक्षालये, फलाट बंद असल्याने या सर्व कामगारांना स्टेशन जवळच्या मैदानाभोवतालच्या झाडांचा आसरा घेऊन राहण्याची वेळ आली, झाडांच्या सावलीत पथारी/सतरंज्या टाकून किंवा तसंच आपापल्या बॅग्सची उशी करून ही मंडळी झोपत होती. यांची खायची प्यायची कुठलीही सोय उपलब्ध नव्हती . झाडांच्या भोवती कचरा, घाण असल्याने डास चावतात, म्हणून SCLR ( सांताक्रूझ- चेंबूर) च्या पुलावर झोपायला जात होते. तीन चार दिवस पोलिसांचे ओरडे/क्वचित तडाखे खाऊन पुन्हा झाडांखाली हे सर्व जण येऊन विसावत होते. यात स्त्रिया आहेत, चिमुरडी बाळं आहेत. त्यांचे शरीरधर्म निभावण्यासाठी त्यांना काहीही सुविधा उपलब्ध नव्हती.

उपासमारीच्या या चक्रात अडकलेल्या कामगारांची माहिती श्रमजीवी संघटना व समर्थन संस्थेच्या कार्यकर्त्या हिंदवी कर्वे यांना श्री हेमंत राजोपाध्ये यांच्या कडून मिळाली. हिंदवी यांनी टिळक नगर येथील काही व्यक्तींशी संपर्क साधून त्या मजुरांना काही मदत करण्याचा प्रयत्न केला मात्र काही उपयोग झाला नाही. शेवटी विवेक भाऊंना संपर्क साधून ही सर्व माहिती दिली. विवेक भाऊनी तत्काळ याची दखल घेऊन बंधित हेमंत राजोपाध्ये यांचा संपर्क क्रमांक व जिथे हे मजूर थांबले आहेत तो पत्ता घेतला. भाऊंनी दुसऱ्या मिनिटाला हेमंत ना फोन करून तासाभरात मी मदत पोचवतो हे आश्वासन दिले.

विवेक पंडित यांनी खासदार श्री. अरविंद सावंत, अतिरिक्त पोलीस कमिशनर (गुन्हे विभाग) श्री. संदीप कर्णिक यांना या बद्दलची माहिती दिली. श्री. अरविंद सावंत यांनी तत्काळ “भाऊ तुम्ही सांगाल त्या ठिकाणी सर्व आवश्यक ती मदत तात्काळ पोचवतो” असे आश्वासन दिले. तर श्री. संदीप कर्णिक यांनी देखील, तात्काळ मदतीची तयारी दाखविली. आणि योग्य ती कार्यवाही सुरू करून उपाययोजना सुरू केल्या, आणि विवेक पंडित भाऊंनी आश्वासन दिल्या प्रमाणे, तासाभरात या कामगारांच्या राहण्याची व अन्नाची सोय करण्यात आली. कर्फ्यु असून ही भाऊंनी केलेल्या त्वरित हालचालींमुळे त्या गरिबांना आवश्यक ती मदत मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here