विलगीकरण कक्षातील दोघांना सुट्टी…चार जण विलगीकरण कक्षात तर १०१ जण होम कॉरेंटाईन…

यवतमाळ : येथील स्व. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात निगराणीखाली (प्रिझमटिव्ह केसेस) असलेल्या दोघांना सुट्टी देण्यात आली आहे. मात्र त्यांना होम कॉरेंटाईन राहण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. विलगीकरण कक्षात आता चार जण असून यापैकी तीन जण पॉझेटिव्ह आहेत. त्यांची प्रकृती स्थीर आहे. तसेच विलगीकरण कक्षात दाखल इतर एका जणाचे नमुने नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय

महाविद्यालयात चाचणीकरीता पाठविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी सांगितले.
जिल्ह्यात विविध ठिकाणी 101 जण होम कॉरेंटाईन मध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर आरोग्य पथकाच्या माध्यमातून तसेच पोलिस पथकाच्या माध्यमातून निगराणी ठेवली जात आहे. होम कॉरेंटाईन असलेल्या नागरिकांनी इतरांच्या संपर्कात येऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here