विक्रोळीत पत्रकाराला पोलिसांची मारहाण…

बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई: नुकतेच वार्तांकन करत असताना एका वृत्तवहिनीच्या पत्रकाराला पोलिसांनी जबर मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच विक्रोळीतसुद्धा वार्तांकन करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका पत्रकाराला पोलिसांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.

अविनाश माने हे एएम न्यूज साठी काम करत असून, दि. ३० रोजी वार्तांकन करण्यासाठी ते विक्रोळी भागात चालत असताना काहीही न विचारता कर्तव्यावर असणाऱ्या पवार नामक एका पोलीस हवालदाराने त्याच्या पायावर काठीने मारले. दरम्यान माने यांनी त्यांचे प्रेस आय डी दाखवण्याचा प्रयत्न केला असता त्या मुजोर पोलिसाने कशालाही न जुमानता अविनाश माने यांच्याशी हुज्जत घालत मारहाण केली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महाराष्ट्र सरकारने लॉकआऊट ची घोषणा करत राज्यभर संचारबंदी जाहीर केली आहे.परंतु, जीवनावश्यक सेवा अविरत सुरू राहतील असेही कळवले आहे.

त्यासोबतच महाराष्ट्राच्या नागरिकांना वेळोवेळी माहिती मिळावी म्हणून माध्यमांना नियमांच्या अधीन राहून वार्तांकन करण्याची मुभा असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले असताना मुंबई चे पोलीस मात्र त्या आदेशाला हरताळ फासत असल्याचे पाहायला मिळत आहे. काल परवा पत्रकाराला केलेल्या मारहानीनंतर आणि आज एक पत्रकारावर झालेल्या लाठी हल्ल्यामुळे पोलिसांचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here