वाशीचे एपीएमसी मार्केट उद्या पासून सुरू होणार…नागरिकांना भाजीपालासह इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होणार

बाळू राऊत प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात 21 दिवसांचे लॉकडाऊन सुरू झाले असून या काळात नागरिकांना भाजीपालासह इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी शासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहे. मुंबई शहराला सुरळीतपणे भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्यासाठी आज मुंबईतील दादर आणि भायखळा मार्केट सुरू करण्यात आले असून उद्यापासून वाशी येथील नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळ यांनी दिली आहे जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतील या गोष्टींबाबत नागरिकांना दिलासा मिळणार आहे. परराज्यातून येणारं सर्व सामान, उत्पादनं सुरक्षित येण्यासाठी पोलीसांचं सहकार्य घेतलं जाणार आहे.

मार्केटमध्येही कोरोना फोफावणार नाही, यासाठीदेखील काही महत्त्वाची पावलं उचलण्यात येणार आहेत. ज्याअंतर्गत बाजार समितीकडून सॅनिटायझर, टेंम्प्रेचर मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिवाय किराणा मालाच्या दुकानात भाजीपाला, अन्नधान्य पोहोचवण्यात येणार आहे.

मार्केट सुरु होणार असं तरीही येथे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यावरही भर देण्यात येणार आहे. ज्या कारणी मार्केट हे टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांवर बाजार समितीचे स्टीकर्स लावण्यात येणार आहे. परिस्थितीचं गांभीर्य पाहता कोकण आयुक्तांच्या निरिक्षणाअंतर्गत वॉर रूम तयार करण्याचं कामही सुरू आहे. एकंदरच जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा जाणवू नये सोबतच कोरोनाचा प्रादुर्भावही वाढू नये यासाठीच उचलण्यात आलेलं हे एक मोठं पाऊल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here