वाशिम जिल्ह्यातील सर्व बँक आता सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु राहणार…संचारबंदीच्या प्रभावी अंमलबजवणीसाठी निर्णय…

वाशिम, दि. ०७ : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार दवाखाने, औषधी दुकाने वगळता सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी व्हावी,

यासाठी आता जिल्ह्यातील सर्व बँकांच्या कामकाजाची वेळ सुद्धा ८ एप्रिल २०२० पासून सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यात संचारबंदी काळात बँकांना किमान मनुष्यबळासह नियमानुसार सुरु ठेवण्याबाबत २६ मार्च रोजी आदेशित करण्यात आले होते. मात्र, आता या आदेशात अंशतः बदल करून जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत, सहकारी व खासगी बँका सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here