राज द्सोनी ,वसई
वसई विरार मध्ये करोनाचा दुसरा रुग्ण आढळल्या नंतर रुग्णाच्या संख्येत वाढ झाली आहे आता वसई विरार मध्ये तब्बल पाच रुग्ण आढळून आले आहे. नव्याने आढळले रुग्ण हे दुसऱ्या रुग्णाच्या सहवासातील मित्रा असून सध्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुसरा रुग्ण हा दुबई वरून तीन ते चार दिवसापूर्वी आला होता. त्याला लक्षण जाणवू लागल्याने तो खाजगी रुग्णवाहिकेने कस्तुरबा येथे तपासणी गेला असता. चाचणी अहवालात त्याला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. याच रुग्णा बरोबर त्याचे तीन मित्रा सहवासात आले होते. त्यांची चाचणी केली असता त्यांना सुद्धा करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे आता वसई विरार परिसरात 5 रुग्ण झाले आहेत. तसेच 7 जणांचा चाचणी अहवाल येणे बाकी आहे.
सध्या जिल्ह्यात 680 लोकांना घरीच अलगिकरणात ठेवण्यात आले होते. त्यातील 281 व्यक्तींचा 14 दिवसांचा कालावधी संपला असून त्या व्यक्तींमध्ये कोणतीही लक्षणे आढळली नाहीत.
जिल्ह्यातून 40 व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 28 व्यक्तींना कोणतीही लागण झाली नाही. अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.