वसई तालुक्यातील करोना रुग्णाची संख्या एकूण १३…३ ग्रामीण भागात तर १ पालिका क्षेत्रात वाढ…

प्रतिनिधी एच.एस. दसोनी

विरार : वसई तालुक्यात करोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत. सध्या वसई तालुक्यात ४ नव्या रुग्णाची वाढ झाली असून त्यातील ३ ग्रामीण भागात तर १ रुग्ण शहरी भागात आढळून आला आहे. यामुळे आता वसई तालुक्यात एकूण १३ रूग्णा सापडले आहेत.

वसई विरार परिसरात शनिवारी चार नव्या रुग्णांची भर पडली आहे. यातील ३ रुग्ण हे नालासोपारा राजोडी ग्रामीण भागातील आहेत. हे रुग्ण अमेरिकेच्या बोस्टन भागातून कतारमार्गे मधून प्रवास करून आले होते.
हे एकूण ५ मित्र असून त्यातील एक पुण्याचा होता. हे पाचही जण आपापल्या ठिकाणी अलगीकरणात होते. त्यात्यील पुण्याच्या व्यक्तीला याला करोनाची लक्षण जाणवू लागली. यामुळे त्याची तपासणी केली असता वैद्यकीय अहवालात त्याला करोनाची लागण  झाल्याचे स्पष्ट झाले.

यामुळे राजोडी येथील चारही जणांचे घस्याचे नमुने परीक्षणासाठी पाठवण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी त्यातील ३ जणांचा अहवाल आला असून त्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

सध्या या रुग्णांना बोळींज येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ते तीनही रुग्ण २८ ते ३५ च्या वयोगटातील आहेत.  तर प्रशासनाने राजोडी परिसर पूर्णतः बंद केला आहे.
चौथा रुग्ण हा महापालिका क्षेत्रात सापडला असून तो ताज हॉटेल मधील कर्मचारी आहे.

तो नालासोपारा पश्चिम येथे राहत असून सध्या त्याला बोळींज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  त्याच्या कुटुंबियांना अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तो कुणाच्या संपर्कात आला याचा तपास सुरु असल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here