वटाण्याची मळणी करताना थ्रेशरमध्ये अडकून मजुराचा दुर्दैवी अंत…पवनी तालुक्यातील वलनी येथील घटना…पोलिसांनी दाखल केला गुन्हा

भंडारा : कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन असतानाही प्रशासनाचे आदेश धुळकावून एका शेतावर वटाण्याची मळणी सुरू होती. दरम्यान, एका मजुराचा थ्रेशरमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज शनिवारला दुपारी १२ वाजताच्या सुमारास पवनी तालुक्यातील वलनी येथे घडली.

◆ स्वप्निल भांडे (२७) रा. बेलाटी ता. लाखांदूर असे मृतक मजुराचे नाव आहे. कोरोनामुळे अनेकांचा जीव गेला तर अनेकजण बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. ही महामारी थांबावी यासाठी केंद्र व राज्य सरकारने, नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी लॉकडाऊन केले आहे. अशा स्थितीत पवनी तालुक्यातील वलनी येथील अरुण तिघरे यांनी त्यांच्या शेतावरील वटाण्याच्या मळणीसाठी लाखांदूर तालुक्यातील बेलाटी येथील नरेश देशमुख यांच्याकडे थ्रेशरमशीन असल्याने वटाणा काढण्याचे काम देशमुख यांना दिले. या कामासाठी पाच मजूर उपस्थित असल्याची माहिती आहे.

◆ वटाण्याची मळणी सुरू असताना स्वप्नील मशीन क्रं. एम एच ३६ झेड ६३३९ या थ्रेशरमध्ये ओढल्या गेल्याने त्याचा करून अंत झाला. घटनेची माहिती मिळताच पवनी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पवनी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. याप्रकरणी पवनी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून अधिक तपास सुरू आहे.

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here