लॉकडाऊनमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर लाखनी पोलिसांचा सिनेस्टाईल छापा…४३ हजारांच्या मुद्देमालासह १४ जुगाऱ्यांना केली अटक

भंडारा : देशात सध्या कोरोनाचे थैमान घातले असल्याने ते थांबविण्यासाठी देश लॉकडाऊन केले आहे. यामुळे कामधंदे बंद असल्याने काही हौशी एकत्र येऊन जुगार खेळत होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी जुगार अड्ड्यावर सिनेस्टाईल छापा घालून १४ जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईल असा ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारला दुपारी ३ वाजताच्या सुमारास लाखनी पोलिसांनी केली. जमावबंदीचा आदेश झुगारून या हे एकत्र आल्याने झालेल्या कारवाईने लाखनीत मोठी खळबळ उडाली आहे.

◆ ईश्वरदास भिवाजी हटनागर (५४), दीपक दुर्गाप्रसाद बादशा (२७), बिसन शंकर वैद्य (५२), विनोद नत्थु वासनिक (५०), लेखराज आनंदराव गिरेपुंजे (२५), सुनील अभिमन लांजेवर (४२), मुजिब युसुफ शेख (३५), मंगेश वरवाडे (२२), योगेश प्रकाश हटनागर (२०), विनोद परसराम नागपुरे (३०), विवेक विकास हटणागर (३०), मंगेश वासुदेव हटनागर (३५), रुपेश श्रीराम मोहनकर (१९), ईश्वर गोपीनाथ ठवकर (३०) सर्व रा. कुंभार मोहल्ला लाखनी अशी पोलिसांनी कारवाई केलेल्यांची नावे आहेत.

◆ लाखनी येथील शिव मंदिराजवळ असलेल्या तलावाचे पाळीवर हे सर्व जुगार खेळत होते. दरम्यान, याची गुप्त माहिती लाखनी ठाण्याचे ठाणेदार दामदेव मंडलवार यांना मिळाली. माहितीवरून मंडलवार यांनी कारवाईसाठी सापळा रचला. त्यानंतर ते आपला ताफा आणि सी. ६० कमांडोसह जुगार सुरू असलेल्या ठिकाणी सिनेस्टाईल छापा घातला. पोलीस असल्याचे दिसताच जुगार खेळणारे सैरावैरा पाळण्याच्या बेतात असताना पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले.

◆ पोलिसांनी या कारवाईत मोबाईल, रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मंडलवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय हेमने व पोलीस कर्मचारी नितीन झंझाड करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here