सम्पूर्ण जगतात कोरोना व्हायरस ने धुमाकूळ घातला असून त्याने देशासह महाराष्ट्रात धुमाकूळ घातला असून त्याचा आर्थिक तीव्र फटका ज्यांचे हातावर पोट आहे अश्या घटकाला बसला असून प्रामुख्याने सांस्कृतिक क्षेत्राची मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली आहे , कलाकारांचे मार्च , एप्रिल , मे हे महिने हंगामाचे असतात या महिन्यात कार्यक्रम करून पुढील वर्षभराची आर्थिक तरतूद उपजीविके साठी ते करत असतात
कोरोना मुळे देशात व महाराष्ट्रात लॉकडाऊन असल्यामुळे या घटकातील कलाकारांवर उपास मारीची वेळ आली आहे सर्व कार्यक्रम रद्द झाले आहेत उदरनिर्वाहाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे , त्या कलाकारांना कला सादर केल्या शिवाय मानधन मिळत नाही आणि त्याशिवाय त्याचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू शकत नाही , कलाकार संवेदनशील आहे मनातील दुःख बाजूला ठेवून ते रसिकांचे मनोरंजन करत असतात येईल त्या संकटाला सामोरे जात असतात परंतु कोणत्याही कलेला राजाश्रय मिळाल्या शिवाय लोकाश्रय मिळत नाही.
सर्व कलाकार सरकार कडे या गँभिर स्थितीत आपण मदतीचा हात द्याल आणि त्यांना साथ द्याल या आशेने कडे पाहत आहेत तरी समस्त कलाकाराच्या वतीने कलाकारांना आर्थिक पेकेज सरकार कडून जाहीर करण्यात यावे या करिता आदरणीय मुख्यमंत्री मा. ना. उद्धवजी ठाकरे , उपमुख्यमंत्री ,अर्थमंत्री मा.ना. अजितदादा पवार व सांस्कृतिक मंत्री मा.ना . अमितजी देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट ,सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने निवेदन देण्यात आले , सरकार सकारात्मक योग्य निर्णय घेऊन कलाकारांना दिलासा देईल असा विश्वास वाटतो ..
जागतिक रंगभूमी दिनानिम्मित कलाकारांच्या वतीने सरकारला विंनती. करण्यात आली अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र प्रदेशचे कार्य अध्यक्ष बाबा पाटील, प्रदेश प्रवक्ते योगेश सुपेकर, व प्रदेश सरचिटणीस प्रशांत मानकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे..