बालाजी तोरणे. प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही, म्हणून आपण निष्काळजीपणाने वागत होतो. मात्र दुर्दैवाने निलंगा येथील जमबाग मज्जित मधून ताब्यात घेतलेल्या 12 पैकी आठ जण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील सर्वच नागरिकाने यासंदर्भात दक्षता बाळगून, स्वतःला होम कोरंटाइल करून घ्यावे. पुढील आदेश येईपर्यंत कोणीही घराबाहेर पडू नये .अत्यावश्यक वस्तूसाठी प्रशासनाकडे संपर्क साधावा, किंवा नगरपालिकेशी संपर्क साधावा.
हे सर्वजण मूळचे आंध्र प्रदेशातील असून के तबलिग जमात गाजियाबाद वरून कर्नूल ला जाणार होते. मात्र त्या गाडीतील ड्रायव्हरला यांचा संशय आल्याने, त्याना निलंगा येथे सोडून तो पळून गेला. त्यामुळे या सर्वांना निलंगा येथील जमबाग मज्जिदीत थांबावे लागले होते. या सर्वावर आता लातूर येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ठेवले आहेत. या लोकांच्या संपर्कात इथं कोण आणि किती लोक आले होते? याची माहिती पोलीस प्रशासन घेत आहे.
मात्र नागरिकांनी सोशल डिस्टन्स कायम ठेवणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारची हलगर्जी महागात पडू शकेल. असा इशारा देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. आपण सामाजिक जाणीवा जपण्यासाठी आपल्या स्वतःच्या कुटुंबियांसाठी आणि राष्ट्रासाठी होम कोरंटाईल करून घ्यावे. आणि राष्ट्राला समाजाला सहकार्य करावे.