रोजंदारीवर काम करणाऱ्या गरजूनंसाठी सलमान खान यांचे मदतीचे हात पुढे सरसावले…

बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई, : सलमान खान मदतीच्या बाबतीत नेहमी देवा सारखा धावून येऊन लोकांची मदत करत असतो – सलमान खानने आतापर्यंत अनेक अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी मदतीचा हात दिल्याचं तर साऱ्यांनाच माहीत आहे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पूूरग्रस्त गाव खिदरापूरला सलमान खान 2019 मध्ये आलेल्या पुरात कोल्हापूर जिल्ह्यात बरेच नुकसान झाले होते. पूरग्रस्तांना आश्रय आणि घरे बांधून देण्यासाठी बॉलिवूड स्टार सलमान खान आणि एलान फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. त्यांना पक्के घर बांधून देण्यात आले.केरळला आलेल्या पूरग्रस्तांसाठी देखील त्यांनी असाच मदतीचा हात दिला. अश्यातच कोरोनाच्या मोठया संकटात आपण अडकलो आहोत. त्यात सलमान खान कसे मागे राहणार.

अभिनेता सलमान खान नेहमी विविध पद्धतीने गरजूंची मदत करीत असतो. त्याच्या बीईग ह्युमन या संस्थेच्या माध्यमातून देशातील अनेक गरजूंना दान करण्यात आलं आहे. यापूर्वी देखील सलमानने सिनेसृष्टीत रोजंदारीवर काम करणाऱ्यांच्या शिक्षण व वैद्यकीय खर्च केला आहे. त्यामुळे कोरोनाच्या या कठीण काळातही सलमान रोजंदारीवर काम करणाऱ्या तब्बल 25000 जणांच्या मदतीसाठी धावून आला आहे

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांचे हाल होत आहे. देशभरात लॉकडाऊन असल्याने हाताला काम नाही. त्यामुळे आता घर कसं चालवायंच असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. यात अभिनेता सलमान खान या कामगारांच्या मदतीला धावून आला आहे.

सलमान खान तब्बल 25,000 रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना मदत करणार आहे. चित्रपटाचं शूटिंग बंद झाल्यामुळे सेटवर काम करणारे, सफाई करणारे, स्वयंपाकाच काम करणाऱ्या कामगारांच्या हाताला काम नाही. यापूर्वी फेडरेशन ऑफ वेस्टर्न सिने एम्लॉई संस्थेने कलाकार व निर्मात्यांना मदतीचं आवाहन केलं आहे. सिनेष्टीतील या कामगारांचे हाल होऊ नये यासाठी सलमान खान fwice या संस्थेच्या संपर्कात आहेत. या संस्थेच्या मदतीने सलमानची टीम रोजंदारीवर काम करणाऱ्या मदत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here