राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री व प्रधानमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार…शरद पवार

बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासन व राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करीत आहे. ह्या जागतिक महारामारीचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी सारखे पाउले उचलावी लागल्याने, लोकांचा रोजगार बुडाला असून शेती व उद्योगधंदे यावर देखील मोठे संकट ओढले आहे. ह्या अभूतपूर्व पसरवलेल्या संकटावर मात करण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष ठाम उभा आहे. असे शरद पवार यांनी जाहीर केले

राष्ट्रवादी पक्षाची एक सामाजिक जबाबदारी म्हणून राज्य व केंद्राच्या सहाय्यता कार्यास हातभार लागावा ह्या हेतूने राज्य विधिमंडळातील विधानसभेचे व विधान परिषदेचे सदस्य यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तसेच संसदेतील लोकसभा सदस्य व राज्यसभा सदस्य यांचे एक महिन्याचे वेतन प्रधानमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. तरी सदस्यांनी धनादेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी जमा करावेत असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here