रामटेक शहरात जंतुनाशक फवारणी सुरू…

राजू कापसे, रामटेक

रामटेक शहरात शनिवारपासून कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जंतुनाशक फवारणी सुरू करण्यात आली.शनिवारी न.प.कार्यालयापासून बसस्थानकापर्यंत जंतुनाशक फवारणी करण्यात आली.शहराच्या सर्व भागात ही जंतुनाशकाची फवारणी करण्यात येणार आहे.

कौरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागलेला आहे.आजपासून आपण कोरोनाच्या तिसर्‍या स्टेजमध्ये आलो आहोत.आता अधिक काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. नगर परिषदेतर्फे मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी नागरिकांसाठी सुचना दिल्या असून त्यांचे पालन करणे आवश्यक आहे.

“लाॅकडाऊन”काळात घराबाहेर पडू नका ,घरातही सुरक्षित अंतर ठेवा, अतिआवश्यक असेल तर कुटूंबातील एकच व्यक्ति घराबाहेर यावा .अशा सुचना कचरागाड्यावरील ध्वनिक्षेपकावरून देण्यात येत आहेत.तर शनिवारपासून “सोडियम हायपोक्लोराईड”या जंतुनाशकाची फवारणी सुरू करण्यात आली.न.प.चे अग्निशमन वाहनाद्वारे ही जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे.

शनिवारी नगरपरिषद कार्यालयापासून फवारणी सुरू करण्यात आली.संपूर्ण रस्ता,रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडील दुकाने अशी ही फवारणी करण्यात आली.मुख्याधिकारी स्वरूप खारगे,नगराध्यक्ष दिलीप देशमुख, आरोग्य विभाग प्रमुख भोईर , यांचे मार्गदर्शनात आरोग्य विभागाचे कर्मचारी फवारणी करीत आहेत. शहराच्या सर्व भागात ही फवारणी करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here