राजू कापसे,रामटेक/नागपुर
कोरोनाचा व्हायरस चा देशभरात वाढता प्रभाव म्हणुन प्रधानमंत्री मोदीच्या २१दिवसाचे लॉककडाऊन ची घोषणा करण्यात आली आहे..देशात सर्वत्र कोरोणाची दहशत सूरू असून नागपुर जिल्हाच्या सर्व सिमा बंद केल्या आहेत..दळणवळणाची कोणतीही ग्रामिण भागात सोय नाही..
राज्यातील विशिष्ट आपातकालीन परिस्थिती विचारात घेता..लक्ष्यनिर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थाना तीन महीण्याचे शिधा एकत्रित पणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय शाशनाने घेतला आहे.या निर्णयाची अमलबजावणी करण्याचा दृष्टिकोनातून परीस्थितीनुसार स्वस्त धान्य राशन दुकानचालकांकडुन एप्रिल
२०२०पासून माहे एप्रिल मे व जुन २०२० साठीच्या अन्नधान्याचे एकत्रित नियतन उपलब्ध करून देण्यात आले…रामटेक तालूक्यातील शिवनी भोंडकी येथे सकाळपासून लाभाथ्याची रांग दिसून आली..स्वस्त धान्य दुकानचालकांकडुन सर्व शासनाच्या नियम अटी सांगुन पहिल्याच दिवशी १२५च्यावर लाभाथ्याना धान्य वाटप केले असून सर्व लाभाथ्याना याचा लाभ घेता येईल असे स्वस्त राशन दुकानचालक महेश माकडे यांनी सांगितले आहे…