रामटेकचे खासदार कूपाल तुमाने यांनी त्यांचा मतदारसंघातील रूई खैरी गावात केले धान्य वितरण…

शरद नागदेवे

नागपूर – आज दिनांक सहा एप्रिल रोजी माननीय खासदार श्री कृपाल तुमाने यांनी त्यांच्या मतदारसंघातील रुई खैरी ता. नागपुर ग्रामीण या गावात जवळपास 512 गावकऱ्यांना दहा किलो तांदूळ ,पाच किलो गहू, मीठ ,मिरची पावडर, हळद ,साबण चे वितरण केले या वेळी श्री.देवनाथ हिरेकन,खुशाल मांढरे, विलास बोबले, सरफराज अहेमद, अनिस बवला, बबलू गौतम, आकाश वानखेडे, प्रविण शर्मा उपस्थित होते.

श्री तुमाने लोकसभेच्या अधिवेशन काळात दिल्ली येथे असल्याने नागपूर येथे त्यांच्या स्व घरी परतल्यावर स्वतःला 14 दिवसांकरिता कोरनटाईन केले होते आज त्यांनी आपल्या मतदारसंघातील गरीब गावकऱ्यांना मदतीच्या उद्देशाने भेट देऊन त्यांना आवश्यक असलेले धान्य दिले नागपूर येथे परततांना त्यांनी बुटीबोरी येथील अर्जुन सामाजिक संघटना यांना देखील भेट दिली बुटीबोरी परिसरात नागपूर शहरातून पलायन करत असलेल्या मजुरांना निवाऱ्याचीसोय करण्यात आली आहे परंतु याठिकाणी योग्य सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याचे तसेच या गरीब मजुरां करिता जेवण्याची योग्य सोय नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले

श्री तूमाने यांनी लगेच माननीय जिल्हाधिकारी व माननीय विभागीय आयुक्त यांना तातडीने फोनवर याठिकाणी योग्य सोयी-सुविधा पुरविण्याकरिता विनंती केली श्री तूमाने रामटेक मतदार संघाचे खासदार असून त्यांना त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांची सातत्याने काळजी असते त्यामुळे दिल्लीहून परत आल्यावर आपल्या मतदारसंघातील नागरिकांना आपल्यामुळे धोका निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी स्वतःला घरी राहून कोरनटाईन करून घेतल्याचे त्यांनी या वेळी सांगितले त्यांचा चौदा दिवसांचा कालावधी संपूर्ण झाला असून ते आता स्वस्थ असल्याने नागरिकांच्या सेवेकरिता गावोगावी जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले

या कालावधीत ते आपल्या मतदारसंघात दिसत नसल्याचे काही लोकांना माफत धादांत खोट्या बातम्या पसरविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले असून अशा संकटाच्या काळी आपला राजनेतिक हेतू दूर सारून हातात हात घालून गरीब नागरिकांना मदत करण्याची त्यांनी विनंती केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here