राज्यातील सर्व शाळांतील वर्ग सुरू होईपर्यंत पालकांना फी भरण्यास भाग पाडू नये – वर्षा गायकवाड

बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई :- महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील सर्व शाळांना वर्ग सुरू होईपर्यंत शालेय शुल्क न घेण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी देशभरातील लॉकडाऊन संपेपर्यंत शाळांनी पालकांना फी भरण्यास भाग पाडू नये, असे निर्देश दिले आहे.

हरियाणा सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात हरियाणा स्कूल बोर्ड, आयसीएसई, सीबीएसई किंवा इतर कोणत्याही मंडळाशी संबंधित सर्व खासगी शाळांना वर्ग पुन्हा सुरू होईपर्यंत शालेय फी न घेण्यास सांगितले आहे.

लॉकडाऊन काळात देशातील अनेक शाळांनी पालकांना फी शुल्क भरण्यास सांगितलं होतं. त्यानंतर पालकांनी यासंदर्भात सरकारकडे तक्रार केली होती. त्यानंतर सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत लॉकडाऊन काळात पालकांकडून फी न आकारण्याचे निर्देश दिले आहेत.

2 COMMENTS

  1. खाजगी व स्यावयंअर्थशासित शाळांची चालू वर्षातील फीशाळा प्पाशासनाने पालकांकडून न आकरता राज्य सरकारने फि थेट शासनास जमा करावी अन्यथा पुढील वर्षि शाळा बंद पडतील..

    • या वर्षिची फी पालकांकडून शाळेने न आकरता शासनाने शाळा पुढील वर्षि शाळा सूरु होण्याकरीता शासनाने शाळांना विद्यार्थ्यांची फी जमा करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here