राज्यातील नागरिकांचे स्थलांतर थांबवा…भगतसिंग कोश्यारी राज्यातील सर्व सहा विभागीय आयुक्तांशी दूरध्वनीवरून चर्चा

बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई : कोरोनाच्या भीतीने आणि रोजगार मिळत नसल्याने अनेक नागरिक राज्यांतर्गत तसेच राज्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणात स्थलांतर करत आहेत. खाजगी गाड्यांमध्ये नागरिक जीव धोक्यात घालून आपले गाव गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक लोक पायी देखील आपले घर गाठण्याचा प्रयत्न करत आहेत.

त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राज्यातील सर्व सहा विभागीय आयुक्तांशी दूरध्वनीवरून चर्चा केली व प्रत्येक विभागातील करोना व्हायरस संक्रमण व लोकांचे स्थलांतर याबाबत माहिती घेतली.

करोना संक्रमण थांबविण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच राज्यातून इतरत्र स्थलांतर करीत असलेल्या लोकांना ते जेथे असतील तेथे थांबविण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना द्यावे, अशी सूचना राज्यपालांनी विभागीय आयुक्तांना केली. सर्व मोठ्या शहरांमध्ये तसेच

औद्योगिक वसाहतींमध्ये सार्वजनिक उद्घोषणा करून स्थलांतर करीत असलेल्या लोकांना थांबण्याचा आग्रह करावा व त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यासाठी शासन तसेच अशासकीय संस्था करीत असलेल्या प्रयत्नांबाबत त्यांना अवगत करावे, असे राज्यपालांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here