यवतमाळ |सेवानिवृत्तीच्या अखरेच्या क्षणापर्यंत बजावले रस्त्यावर कर्तव्य…कोरोना लढाईतला हाही एक चेहरा…वाचा

सचिन येवले ,यवतमाळ

यवतमाळ: कोरोना विषाणूचा पराभव करण्यासाठी पोलिस प्रशासन चोविस तास रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य बजावत आहे. या संकट काळात भूक, तहान कशाचीही तमा बाळगताना हे कर्मचारी दिसत नाही. केवळ एकच ध्यास दिसून येतो. कोरोनाला पराभूत करण्याचं. यातच सेवनिवृत्तीच्या अखरेच्या क्षणापर्यंत पोलिस कर्मचाऱ्याने रस्त्यावर उभे राहून कर्तव्य बजावले.

सहायक पोलिस उपनिरीक्षक अशोक कांबळे,असे या निवृत्त कर्मचाऱ्याचेनाव आहे.ते लोहारा पोलिस ठाण्यात कार्यरत होते. पोलिस दलात आयुष्यातील३५ वर्षांची सेवा बजावली. सेवानिवृत्त पूर्व तीन महिने रजा मंजूर असताना त्यांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिले. तसेही पोलिस खाते अतिशय शिस्तीचे आहे. सण, उत्सव, सभा, निवडणूक कोणताही कार्यक्रम असला की,

पोलिस कर्मचाऱ्यांना आपल्या सुट्ट्यांवर पाणी फेरावे लागते. घरात कुणी आजारी असल्यास रुग्णालयात नेऊ शकत नाही. कुटुंबात सण-उत्सव साजरा करू शकत नाही. मात्र, समाजाचा पोलिसांकडे बघण्याचा दृष्टीकोन हा उपेक्षित आहे. चार दोन लोकांमुळे सर्व कर्मचाऱ्यांना त्या नजरेने पाहणे चुकीचे आहे. यातून एक तणाव निर्माण होतो, हे कुणीही नाकारू शकत नाही.

तरीदेखील पोलिस आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीसह जिल्हा लॉकडाउन करण्यात आला. एकही नागरिक रस्त्यावर येऊ नये, त्यांनी आपल्या घरात सुरक्षित रहावे. असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून केले जात आहे.

आपला देश या संकटातून बाहेर निघावा, यासाठी धडपड सुरू आहे. यावेळी सहायक पोलिस उपनिरीक्षक अशोक कांबळे आपल्या घरी स्वस्थ बसू शकले नाही. आज ३५ वर्षांच्या सेवेतील अखेरचा दिवस असताना सायंकाळी ठीक सहा वाजेपर्यंत कर्तव्य बजावले. आपण आता निवृत्त झालो,आज त्याचे वरिष्ठ जिल्हा पोलिस अधीक्षक एम राजकुमार ,ठाणेदार सचिन लुले पाटील, सहायक पोलिस निरीक्षक सुजाता बनसोड आणि अशोक कांबळे च्या सहकाऱ्यांनी आज ज्या ठिकाणी कांबळे कर्तव्य बजावत होते तिथे जाऊ त्याना जड अंतकरणाने सहकाऱ्यांचा निरोप घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here