यवतमाळ जिल्ह्यात उद्या पासून जिल्ह्यातील भाजीपाला,किराणा दुकाने सकाळी ६ ते दुपारी ३ या वेळेतच उघडी राहणार…

यवतमाळ- विलगीकरण कक्षात प्रिझेंमटिव्ह केसेस वाढत असल्यामुळे नागरिकांनी शासनाच्या सुचनेनुसार घरातच राहणे आवश्यक आहे. अत्यावश्यक कामानिमित्त बाहेर निघालेच तर दोन नागरिकांमध्ये ठराविक अंतर असले पाहिजे. मात्र नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.

नागरिक दुकानांवर गर्दी करत असून ठरावीक अंतर ठेवत नसल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, भाजी बाजार इतर ठिकाणी ठराविक अंतराचा नियम पाळत नसल्यामुळे प्रशासनाने गुरुवार (दि.2) पासून जिल्ह्यातील भाजीपाला, किराणा दुकाने सकाळी 6 ते दुपारी 3 या वेळातच उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यातून दवाखाने आणि मेडीकल वगळण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here