यवतमाळात पोलिसच धावले मदतीला…एका व्हाट्सअपप्स वर किराणा तुमच्या घरी…पाहा व्हिडीओ

सचिन येवले यवतमाळ

यवतमाळ : कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरीच सुरक्षित थांबावे, असे आवाहन करण्यात येत असले तरी खरेदीच्या निमित्ताने लोक घराबाहेर पडताना दिसत आहेत.

यातही पोलिस प्रशासनाने मार्ग काढला आहे. अ‍ॅप, व्हाट्सअ‍ॅपवर मागणी नोंदविल्यास घरपोच साहित्य पुरविण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या आदेशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवणार्‍या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशासह, राज्य, जिल्हा लॉकडाउन करण्यात आला आहे. यवतमाळ शहरातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, त्यांची जीवनावश्यक वस्तूंची गरज पूर्ण करण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा पोलिस दलाच्या वतीने 9356758776 हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here