म्हणून संतापले नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंढे…

शरद नागदेवे

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यानी रूग्णालय अवस्था पाहून त्यांना संताप अनावर झाला. त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देत.

आपलं काम जमत नसेल तर घरी जा असा इशारा नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी डॉक्टरांना दिला.

नागपूर महानगरपालिकेचं सर्वात चांगलं असणारं रूग्णालय आज उकिरड्यासारखं झालं आहे. असे प्रकार कदापी खपवून घेतले जाणार नाही, असं म्हणत मुढे यांनी सर्वांना सक्त ताकीद दिली.

महानगपालिकेचे डॉक्टर्स योग्यरित्या आपली प्रॅक्टिस करत नाही. ज्यांना काम जमत नसेल त्यांनी घरी जावं, असं ते यावेळी म्हणाले. दरम्यान, करोनाविरूद्ध लढण्यासाठी आरोग्य विभागानं सज्ज राहावं, असे आदेश त्यांनी यावेळी दिले.

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here