मोठी बातमी | बुलढाण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ…चिखली येथील आणखी एक पॉझिटीव्ह…आता संख्या ९ वर…

बुलडाणा : शहरातील एकाचा बळी घेतल्यानंतर कोरोना विषाणूने बुलडाणा जिल्ह्यात हातपाय पसरण्यास सुरुवात केली असून, रविवारी आणखी तीघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर आता नवीन अहवाल समोर आला असून चिखली येथील आणखी एक पोजिटिव्ह रिपोर्ट प्राप्त झाला झाला आहे

दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या खामगाव, देऊळगाव राजा व चिखली येथील तिघांचा यामध्ये समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांचा संख्या आता ९ झाली असून, यापैकी एकाचा २८ मार्च रोजी मृत्यू झाला आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील एकून ३० जण दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. या सर्वांचा शोध घेऊन त्यांचे स्वॉब नमुणे तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहेत. यापैकी तिघांचे नमुणे पॉझिटिव्ह आले आहेत. १२ नमुणे निगेटिव्ह आले असून, १४ नमुणे अद्याप प्रलंबित आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातून पाच मार्च पासून आजपर्यंत एकूण ८३ व्यक्तींचे स्वॅब नमुने हे नागपूर येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत ६३ जणांचे स्वॅब नमुने प्राप्त झाले आहेत. कालपर्यंत ही संख्या ५३ होती. दरम्यान, यापैकी सहा जणांचे रिपोर्ट हे पॉझीटीव्ह आले होते.

त्यातील एकाचा २८ मार्च रोजी मृत्यू झाला होता तर अन्य चार जण हे मृत व्यक्तीच्या निकट संपकार्तील होते. ते सध्या आयसोलेशन कक्षात आहेत. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here