मोठी बातमी | बुलडाणा शहरात आणखी कोरोना १ पॉझिटिव्ह…संख्या आता ५ वर…

बुलडाणा : राज्यात आज कोरोना बाधित ३३ नवीन रुग्णांची नोंद झाली. यातील ३० रुग्ण मुंबईचे, पुणे येथील २ तर बुलढाण्याच्या १ रुग्णाचा समावेश आहे. यामुळे राज्यातील एकुण बाधित रुग्णांची संख्या ३३५ झाली आहे.

आज गुरुवार २ एप्रिल रोजी आणखी एक रिपोर्ट पाॅझिटिव्ह, २ निगेटिव्ह आले आहेत.. व 3 रिपोर्ट अजून येणे बाकी असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. प्रेमचंद पंडित यांनी दिली.

बुलडाणा शहरात कोरोना पॉझिटिव्ह संख्या आता ५ त्यातील एक जण आधीच मृत झालेला आहे.

विशेष म्हणजे काल बुधवार १ एप्रिल रोजी सायंकाळी हायरिक्स मधील प्रलंबित ८ ही रिपोर्टस निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला होता.

पण आज हायरिस्क मध्ये नसलेल्या ६ पैकी ३ प्राप्त रिपोर्टपैकी १ जण पॉझिटिव्ह व २ निगेटिव्ह आले आहेत. त्यातील अजून ३ रिपोर्ट येणे बाकी आहेत. आज पॉझिटिव्ह आलेला त्या मृत व्यक्तीच्या संपर्कातीलच असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here