मूर्तिजापूर प्रतिनिधी नरेंद्र खवले
सध्या सर्वी कडे संचारबंदी सुरु आहे.अकोला लॉक डाउन असल्या मुळे हातमजुरी करणारे व मोल मजुरी करणारे खूपशे परिवार उपाशीपोटी आहे. संचारबंदी लागू असल्यामुळे कुठेही काम सुरु नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
या सर्व गोष्टींच्या मूर्तिजापूर येथील समाजसेवक गुलाब चंद्रजी दुबे यांच्या लक्षात आला व त्यांनी माननीय उपविभागीय अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन या सर्व गोरगरिबांना अन्न वाटप करण्यासाठी परवानगी मागितली व त्यांनी असा संकल्प केला आहे.
की जोपर्यंत लोक डाऊन आहे. तोपर्यंत गोरगरीब,हात मजुरी,अपंग, मतिमंद अश्या लोकंना दिनांक 27/03/2020 पासून जोपर्यंत लॉक डाऊन सुरू राहील तोपर्यंत रोज अन्नपुरवठा व पाणी बॉटल स्वखर्चाने वाटप करण्याचा निश्चय केला आहे. संपूर्ण तालुक्यात रोज 400 ते 500 लोकांपर्यंत अन्नपुरवठा त्यांची टिम करीत आहे.
त्यांच्या या सहकार्यात त्याच्या सोबतीला स्वेच्छेने श्री प्रमोद ऊपाध्ये, महादेवराव खळतकर, महालक्ष्मी मंगल कार्यालयाचे संचालक किरण देशमुख, रवींद्र वानखडे, राजू राजपाल प्रेमचन्द्र दुबे व वाहन चालक संतोष मुगल हे सहकार्य करीत आहे.