मुस्लिम समाजा तर्फे सदभावना सामुहिक ल़गर…

 

चंद्रपूर :कोरोना विषाणू संसर्ग परिस्थितीत समाजातील सर्व घटक जमेल तसे आपापल्या परीने आपादग़स्तांना मदत करीत आहेत.शहरातील मुस्लिम समाजातफै सुद्धा सामुहिक सद्भावना लंगर सुरू करून दररोज ४००ते ५०० गरजूंना भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

गत ८ दिवसांपासून मुस्लिम समाजाचे सामुहिक सद्भावना लंगर तर निरंतर सुरू आहेच.याशिवाय फळेवाटप, किराणा मालाचे वितरण सुद्धा निरंतर सुरूच आहे.शहरातील हजारो आपादग़स्त या सद्भावना सामुहिक ल़ंगर ने लाभन्वित होत असून मुस्लिम समाजाने आपले सामाजिक दायित्व निभावून एक आगळावेगळा उपक्रम राबवून सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे.

अॅड.फरहत बेग यांचे नेतृत्त्वाखाली आंबिद क्युरेशी,फिरोज पठाण,अहमद खान,अमर आली,सलीम शेख,मकसुद शेख,नाजिम खान, दारासिंग कोले,नौसेर शेख,जावेद शेख, रहमान पटेल,रशिद शेख.शादाब शेख,परवेज शेख,नाहिद हुसेन हे समाज बांधव सद्भावना लंगर करीता सतत परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here