मुर्तिजापुर – संदीप जळमकर यांचा प्रभागातील कामासाठी स्वखर्चाने पुढाकार…

मुर्तिजापुर – शहर हे गेल्या ३० वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करतोय मात्र यंदा पाउस चांगला झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तर आपल्या प्रभागात पाण्याची टंचाई भासू नये यासाठी काही नगरसेवक स्वखर्चाने प्रभागातील कामे करतात.

प्रभाग करा. ११ च्या भाजपचे कार्यकर्ते संदीप जळमकर यांनी संचारबंदीत पिण्याच्या पाण्याची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेत स्वखर्चाने संपूर्ण संतोष नगरची नविन पाईप लाईन्सचे ब्लॉक स्वता ३ ते ४ दिवसापासून स्वता उभ राहून स्वखर्चाने हे काम सुरु असून ते काम शेवटच्या टप्य्यात आहे.

जेणेकरून नागरिकांना पाण्यासाठी बाहेर भटकावे लागणार नाही.यासोबतच संपूर्ण भाग ११ मध्ये फॉगिंग मशीनने स्वखर्चातून
फवारणी सुद्धा करण्यात आली आहे.या कामासाठी प्रभाग ११ मधील नागरिकांनी त्यावेळी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here