मुर्तिजापुर येथे शिवभोजन योजनेचा उदघाटन सोहळा संपन्न…

मूर्तिजापुर: महाराष्ट्र शासनाच्या धोरना नुसार गरीब व गरजु व्यक्तिना स्वस्त दरात शिव भोजन उपलब्ध करून देण्याचे उदिस्ट पूर्ण करण्याच्या दृस्टिने स्थानिक लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय शंकर टी कॉर्नर येथे योजनेचे उदघाटन तहसीलदार प्रदीप पवार,वैधकीय अधीक्षक डॉ, राजेंद्र नेमाड़े, इसळकर,समाजसेवक अप्पुदादा तिड़के, संतोष इंगोले, देवाशीष भटकर,सागर पुंडकर, अतुल गावंडे यांचे प्रमुख उपस्थित पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलनाने व गरीब,गरजु लोकांना भोजन देऊन करण्यात आली.व पाहुन्यांंचे स्वागत शंकर टी कॉर्नर चे संचालक विष्णु लोडम यांनी केले.

यावेळी रुग्णालयाचे कर्मचारी नितिन देशमुख, प्रभुदास संगेले,पुरुषोंत्तम गभने,विजय डांगे,संजय चाहकर, मुगल,इमरान, पुंडलिक संगेले, सेनापति,विनोद इंगले ,शंकर लोडम,संतोष, लोडम ,अमर सोनेकर उपस्थित होते.

यावेळी रुग्णालयातिल रुग्णाचे नातेवाईकानि व कोरोना मुळे भयभीत नागरिकांनी भोजनाचा लाभ घेतला .
शासनाचे उदिस्ट पुर्ण करण्यास कटिबद्ध असल्याचे मत ज्ञाननर्मदा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ सुनीता लोडम यांनी व्यक्त केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here