मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये वनरक्षक,वनपाल एक दिवसाचा पगार देणार… अजय पाटील

शरद नागदेवे

नागपूर – कोरोना विषाणूचा प्रार्दुभावने संपूर्ण जगभरात मोठे थैमान घातले आहे.महाराष्ट्रासह,इतर राज्यात मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना तसेच वनमजूर, वनकर्मचारी तसेच वनक्षेत्रीय कर्मचारी संघटनेची बैठक नुकतीच पार पडली.

त्यात महाराष्ट्रातील वनपाल व वनरक्षकांचे एका दिवसाचे वेतन देण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला.हा जवळपास दोन कोटींचा निधी मुख्यमंत्री साह्यता निधीत जमा करण्याची माहिती एका पत्रकाद्वारे संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here