गणेश तळेकर
मुंबई – संपूर्ण देश कोरोना संकटाशी लढा देण्यासाठी एकत्र उभे आहे. जर कोणी घरी राहून देशाची सेवा करीत असेल तर कोणी त्यांच्या कष्टाच्या पैशाचे दान देऊन सहकार्याचा प्रयत्न करीत आहे. तर अभिनेता शाहरुख खाननेही कोरोनाविरूद्धच्या या युद्धात मोलाचे योगदान दिले आहे.
गुरुवारी त्यांनी मदतीची घोषणा केली. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करून शाहरुखचे आभार मानले आहेत.
जेव्हा मुख्यमंत्र्यांनी इंग्रजीत शाहरुखचे आभार मानले तेव्हा शाहरुखने त्याला मराठीत उत्तर देऊन आश्चर्यचकित केले. शाहरुखचे मराठीतले ट्विट पाहून चाहतेही प्रभावित झाले. शाहरुख खानने मराठीत ट्विट केले- आम्ही सर्व एक कुटुंब आहोत. या वेळी निरोगी होण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र असले पाहिजे.