मुंबई मध्ये एका रुग्णालयातील ३ डॉक्टर व २६ नर्स यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट…

बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई : मुंबईच्या वोक्हार्ट रुग्णालयातल्या तब्बल २६ नर्स आणि ३ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे मुंबई महापालिकेतर्फे वोक्हार्ट रुग्णालय आणि आजूबाजूचा परिसर हा ‘कंटेन्टमेंट झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. मुंबई सेंट्रल या भागात हे रुग्णालय आहे.या रुग्णालयात काम करणाऱ्या २७० नर्स, डॉक्टर आणि काही रुग्णांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे. यापैकी ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे त्या सगळ्यांना विलगीकरण कक्षात ठेवलं जाणार आहे

त्यामुळे या रुग्णालयातून कोणीही आतून बाहेर जाऊ शकणार नाही. तसंच कोणीही बाहेरुन रुग्णालयातमध्ये जाऊ शकणार नाहीय.जोपर्यंत या रुग्णालयातल्या सर्व रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत हा परिसर ‘कंटेन्टमेंट झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे.
वोक्हार्ट रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एक रुग्ण दाखल झाला होता.

या रुग्णाच्या छातीत काही त्रास होत असल्यामुळे त्याला भरती करण्यात आलं होतं. त्यानंतर या रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. हा रुग्ण चार दिवस रुग्णालयात होता. या रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे या सर्वांना कोरोनाची लागण झाली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here