महिला विषाणूतज्ज्ञ मिनल दाखवे-भोसले यांचं अमूल्य योगदान…भारतातील पहिलं कोरोना टेस्ट किट तयार…

बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई :आपल्या भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. आणि एका माणसामागे साधारणत 3500 ते 4500 हजार रुपये कोरोना तपासणीचा खर्च येत होता. अशातच आपल्या मेड इन इंडिया निर्मित किटचे पुण्यातल्या मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने कोरोना टेस्ट किट बनवली आहे. मोल्युकोर डायगोस्टिक क्षेत्रात या कंपनीचं काम असून अशा विविध आजारांचं निदान करण्यासाठीच्या अनेक किट्स त्यांनी याआधी तयार केल्या आहेत.

सध्या भारत जर्मनीमधून Covid-19 च्या टेस्ट किट मागवतो आहे. मात्र जगभरातूनच या किट्सला मागणी असल्याने त्या मिळविण्यात अडचणीही येतात. त्याबरोबर त्या काहीशा महागड्याही आहेत. ही स्वदेशी किट बाहेरच्या किट्सच्या मानाने स्वस्त असल्याची माहिती मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्सचे रणजित देसाई यांनी दिली. “आम्ही एका आठवड्यात एक ते दीड लाख किट्स तयार करू शकतो. यांची किंमत विदेशी किटपेक्षा चौपटीने स्वस्त आहे.”पुण्यातल्या कंपनीनं 6 आठवड्यात संशोधन करून 100 टक्के स्वदेशी बनावटीची किट तयार केली आहेत. पुणे मधील मायलॅबने आठवड्यातून 1 लाख किट निर्मिती करण्याचे आश्वासन दिले असून, एका किटनं 100 रुग्णांची तपासणी करता येणार असल्याचा दावा कंपनीनं केला आहे.

विशेष म्हणजे देशातल्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं ही या स्वदेशी किट्सला मान्यता दिली आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि इतर आंतरराष्ट्रीय मानकांनुसार ही किट बनवण्यात आली असून, त्याला *देशातल्या एफ डी ए (FDA) आणि सेंट्रल ड्रग्स स्टॅन्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (Central Drugs Standard Control Organisation या संस्थांनीही परवानगी दिली आहे अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावल यांनी दिली. अतिशय कमी किमतीत ही कीट तयार करण्यात आली असून, त्यासाठी फार कालावधीसुद्धा लागलेला नाही
महिला विषाणूतज्ज्ञ मिनल दाखवे-भोसले यांचं अमूल्य योगदान आहे

विशेष म्हणजे हे किट्स तयार करण्यासाठी महिला विषाणूतज्ज्ञ मिनल दाखवे-भोसले यांचं अमूल्य योगदान आहे. मिनल भोसले मायलॅब या फार्मा कंपनीत संशोधन आणि विकास विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील टीमनेच भारतातील पहिल्या ‘कोरोना टेस्ट किट’चा शोध लावला आहे. विशेष म्हणजे त्या गर्भवती असताना देखील त्यांनी जनतेसाठी खूप महत्वाचे किट तयार केले आहे.
प्रसूतीनंतर मिमिनल दाखवे-भोसले आपली प्रतिक्रिया दिली आहे

सध्याचा आणीबाणीचा काळ आहे. त्यामुळे या काळात मी आव्हान म्हणून हे काम करण्याचं ठरवलं होतं. मला माझ्या देशासाठी काही तरी योगदान द्यायचं होतं. माझ्या 10 सहकाऱ्यांच्या टीमने हे काम यशस्वी केलं.” विशेष म्हणजे प्रसूतीच्या 1 दिवस आधीच (18 मार्च) त्यांनी या कोरोना किटचं काम पूर्ण करून त्याच्या मान्यतेसाठी ते राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजी) पाठवलं. राष्ट्रीय विषाणू संस्थेने देखील ही किट 100 टक्के निकष पूर्ण करत असल्याचं सांगत त्याला मान्यता दिली, असं मिनल भोसले म्हणाल्या आहेत.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर वरुण केले अभिनंदन आणि कौतुक

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही त्यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. त्यांनी आधी भारतातील पहिलं कोरोना टेस्ट किट जन्माला घातलं आणि नंतर स्वतःच्या बाळाला जन्म दिला. पुण्याच्या डॉ. मीनल दाखवे भोसले यांचे अनंत आभार. अशा कर्तव्यनिष्ठ माणसांसमोर मान आदराने झुकते, अशा भावना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केल्या आहेत.

मिनल यांच्या या कामगिरील सलाम करत आव्हाडांनी एक ट्वीट केलं आहे. त्यात ते म्हणाले की, ‘त्यांनी आधी भारतातील पहिलं कोरोना टेस्ट किट जन्माला घातलं आणि नंतर स्वतःच्या बाळाला जन्म दिला.पुण्याच्या डॉ. मीनल दाखवे भोसले यांचे अनंत आभार. अशा कर्तव्यनिष्ठ माणसांसमोर मान आदराने झुकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here