महाव्हाईस च्या बातमीचा दनका…त्या पर्यवेक्षीकेला अंगणवाडीत सभा घेणे पडले महागात…एकात्मिक प्रकल्प अधिकाऱ्यांने दिला कारणे दाखवा नोटीस…

चिमुर सुनिल कोडापे
देशात कोरोणा या आजाराने थैमान घातल्याने सर्वत्र देशात लाकडाउन व संचारबंदी सुरू आहे. कर्मचाऱ्यांची कामावरची कपात करन्यात आली आहे. मात्र शंकरपुर, किटाळी सर्कलच्या पर्यवेक्षीका पोर्णिमा राठोड यांनी शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवुन मंगळवार ला शंकरपूर येथील अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकाची सभा घेतली असल्याचे

एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी पुणम गेडाम यांच्या निदर्शणास आले त्यामुळे त्यांनी तात्काळ संचारबंदीचे उलंघ्घन केल्या बदल त्या पर्यवेक्षिकेला कारणे दाखवा नोटीस मंगळवारच बजावीला आहे. त्यामुळे अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांची सभा घेने त्या पर्यवेक्षिकेला महागात पडले आहे.

अंगणवाडी पर्यवेक्षिका पोर्णिमा राठोड यांचेकडे शंकरपूर कीटाडी या दोन सर्कलचा चार्ज आहे. या सर्कलमध्ये पन्नासच्या जवळपास अंगणवाडी येतात. मंगळवार ला शंकरपूर येथील वार्ड क्रमांक दोन मधील अंगणवाडी क्रमांक पाच मध्ये मासीक सभेच्या अहवालासंबधी अंगणवाडी सेविकांची सभा बोलवीली होती.

या सभेला चाळीस ते पन्नास सेविका हजर होत्या शासनाच्या आदेशानुसार कोवीड १९ वायरसची साथ आटोक्यात आनन्याकरीता टिव्हि व विवीध माध्यमाद्वारे

शासनस्तरावरून संचारबंदी करन्यात आली असताना पर्यवेक्षिका राठोड यांनी अंगणवाडी सेविकांची सभा अंगणवाडी केंद्रात घेतली असल्याचे मोबाईल व्दारा एकात्मीक बालविकास प्रकल्प कार्यालयाला मंगळवारला सभेच्या दिवशी कळविन्यात आले होते. हि बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे.

पर्यवेक्षिका यांना आयुक्त यांचे आदेशान्वये संपुर्ण कामकाजाचे सनियंत्रण व मासीक सभेचा अहवाल मोबाइलच्या माध्यमातुन कार्यालयाला पाठवीन्याचे आदेश असताना अंगणवाडी सेविकांची सभा घेवुन संचारबंदीचा भंग झाल्याचे

एकात्मिक प्रकल्प अधिकारी पुणम गेडाम यांच्या निदर्शनास आल्याने प्रशासकीय कार्यवाही का करू नये यासाठी पर्यवेक्षिकेला कारणे दाखवा नोटीस बजावुन चोवीस तासाच्या आत खुलासा सादर करावा अन्यथा प्रशासकीय कार्यवाही करन्यात येईल अशी नोटीस देन्यात आली.

संचारबंदीच्या दरम्यान सभा घेने पर्यवेक्षिकेला महागात पडले त्यामुळे पर्यवेक्षिका राठोड वर कोनती प्रशासकीय कार्यवाही होते याकडे शंकरपूर वासीयांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here