महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सदस्य पत्रकारांस भद़ावती पोलिसांची घरासमोर बेदम मारहाण…

चंद्रपूर:-महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा भद़ावती चे सदस्य पत्रकार व शाखेचे प़सिद्धी प़मुख उमेश कांबळे यांना दिले.२६ माच॔ ला सांय.५वाजता त्यांचे घराचे गेटसमोरच पोलिसांनी बेदम मारहाण केल्याने जिल्ह्यातील पत्रकार वतु॔ळात तिव़ रोष व्यक्त केला जात आहे. राज्य भरातील या पत्रकार संघाचे पत्रकार सदस्य व पदाधिकारी (जी संख्या संपूर्ण राज्यात १०००० चे वर आहे)

कोरोना संक़मनाचे या गंभीर काळात तन,मन,धनाने सहकार्य करीत असतांनाच मात्र भद़ावती पोलिसांनी साधी विचारपूस व दखल न घेता पत्रकार सदस्य बांधवास घरासमोरच बेदम मारहाण केल्याने पत्रकार बांधवांमध्ये मोठाच असंतोष निर्माण झाला आहे.

संघाचे भद़ावती तालुका कार्यकारिणी ने पोलिस निरीक्षक यांचे माफ॔तीने पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांना निवेदन पाठवून आपला रोष कळविला असून संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.विशेष म्हणजे सर्वत्र लाॅकडाऊन सुरू होताच या पत्रकार संघाने पत्रकातून जनतेला शासकिय सुचना पाळण्याचे व घराबाहेर न पडण्याचे मामिक आवाहन करुन पत्रकार संघ सदैव मदतीस तयार असल्याचे आवाहन केले होते.

कोरोना दहशतीचे वातावरणात याच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे शेकडो सदस्य बांधवांनी रक्तदान केले आहे.आतापय॔त ७ रूग्णवाहिण्या शासनाकडे रूग्णसेवेसाठी दिलेल्या आहेत.जनजागुतीचे निरंतर काम पत्रकार संघाचे सदस्य करीत आहेत. केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जिव धोक्यात घालून काम करणाऱ्या पत्रकार मंडळींना त्यांना न अडविण्याच्या सुचना केलेल्या असतांनाच भद़ावती पोलिसांनी आपली भडास हकनाक काढून चौथ्या स्तंभाचा प़चंड अपमान केल्याने सव॔त्र रोष व्यक्त केला जात आहे.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा कार्यकारिणी तफै लवकरच या संबंधाने निवेदनातून अवगत करणार असल्याचे जिल्हा अ्ध्यक्ष सुनिल बोकडे, कार्याध्यक्ष जितेंद्र चोरडिया यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here