डेस्क न्यूज – कोरोना या विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार देशात होत आहे. याची लागण झाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. तर अनेक बाधितांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचे देशावर संकट ओढवले असून नागरिकांना यापासून वाचण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा म्हणजेच १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषीत केला आहे. देशभरात सीआरपीसी १४४ प्रमाणे संचारबंदी लावण्यात आली आहे. तर महाराष्टात कोरोनाच्या रुग्णात वाढ झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे
महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ११६ झाली आहे.आज सांगली येथील एकाच कुटुंबातील ५ सदस्य संसर्गातून बाधीत आढळून आले आहेत व मुंबई येथे ४ सदस्य प्रवास इतिहास अथवा संसर्गातून बाधीत झाले आहेत. यापैकी १४ सदस्य बरे होऊन रुग्णालयातून सोडण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत.अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री rajesh टोपे यांनी आपल्या ट्वीटर अकौंट वरून दिली आहे.
सोमवारपर्यंत महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ९७ वर होती. मंगळवारी सकाळी ४ नवे रुग्ण आढळल्याने ती १०१ वर पोहचली. त्यानंतर संध्याकाळपर्यंत ही संख्या १०७ वर पोहचली. आता नऊ नवे रुग्ण आढळल्याने ही संख्या ११६ झाली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंता वाढवणारीच ही बातमी आहे. तरीही घाबरुन जाऊ नका आणि स्वयंशिस्त पाळा असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.