मराठवाडयातील फळ उत्पादक शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई द्या…स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रवक्ते डॉ़. शिवाजी हुसे यांची मागणी…

औरंगाबाद कन्नड ( सोमनाथ पवार : प्रतिनिधी ) कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मराठवाड्यासह महाराष्ट्रातील फळ उत्पादक शेतक -यांचे मोठे नुकसान झाले आहे . मराठवाडा हा सतत अवर्षण ग्रस्त भाग राहिला आहे . बिकट परिस्थितीवर मात करीत येथील शेतकरी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून फळबाग लागवड करीत आहेत . त्यामध्ये चिकू , डाळींब , मोसंबी , संत्रा , आंबा , द्रांक्षे याचा समावेश आहे .

त्यासाठी शेतकऱ्यांचा खर्चही मोठया प्रमाणात झालेला आहे .को रोनाच्या पाश्र्वभूमीवर व्यापा -यांनी व ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे व सर्व व्यवहार ठप्प असल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.

त्यामुळे फळ बाग उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता शासनाने भरीव मदत करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा प्रदेश प्रवक्ते डॉ . शिवाजी हुसे , मराठवाडा अध्यक्ष गजानन बंगाळे पाटील , युवती प्रदेशाध्यक्ष पुजाताई मोरे , प्राचार्य बहिरट , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष मारोती भाऊ वराडे , पक्षाध्यक्ष कृष्णा साबळे आदींनी केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here