मंदिरांनी आपली दानपेटी देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटातून मुक्त होण्यासाठी व समाजहितासाठी उघडी करावी…आ.रोहित पवार

बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई –कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉक डाऊन केले आहे. राज्यात संपूर्ण संचार बंदी लागु केली आहे. कारोना विषाणूने हाहाकार माजवला असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी व्यावसायिक, खेळाडू, सिनेसृष्टीतील अनेक मोठ्या व्यक्तींनी कोट्यवधी रुपयांची मदत केली आहे. अशातच

राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील देवस्थानांही मदत करण्याचे आवाहन केले आहे.
रोहित पवार म्हणाले कि, कोरोनाविरुद्धच्या लढाईत मदतीसाठी पुढं आलेल्या लालबागचा राजा, सिद्धीविनायक, शिर्डी या देवस्थानांचे आभार. देणगी रुपात जमा झालेला दानपेटीतील पैसा समाजासाठी देण्याची हिच वेळ आहे. इतर देवस्थानांनीही आपली दानपेटी समाजासाठी खुली करावी, अशी माझी विनंती आहे व ते करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. हे ट्विट त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here