भुसावळ प्रतिनिधी ( धम्मरत्न गणवीर )
भुसावळ संपूर्ण राज्यात तसेच भुसावळ शहरात संचारबंदी लागु करण्यात आली आहे .नागरिकांनी कोणत्याही करणासाठी घराबाहेर निघु नये .जे नागरिक रस्त्यावर किंव्हा घराबाहेर आढळून येतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल यांची नोंद घ्यावी .
असे परिपत्रक भुसावळ नगरपरिषद व पोलिस प्रशासना तर्फे करण्यात आले आहे .शहरातील औषधालय’ किराणा दुकाने ‘ भाजी पाला ‘ दूध ‘ अतिआवशक सेवेची सुविधा सुरू राहील व त्यांची वेळ पुढील प्रमाणे आहे .
मेडिकल दुकाने सतत चालू राहतील .
भाजीपाला लिलाव सकाळी ५ ते ८
भाजीपाला किरकोळ विक्री सकाळी ५ ते १०
किराणा दुकान दूध अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी ६ ते १०
भुसावळ करांचाही संचारबंदी ला प्रतिसाद दिसून येतो परंतु काही रिकामं टवाळे बाहेर काही काम नसताना फिरताना दिसत असल्याने पोलिसांनी त्यांना चांगलच चोप देण्यात येत आहे व यापुढे जे काही काम नसताना बाहेर फिरतांना आढळून आल्यास त्यांना मैं समाज का दुश्मन हूँ लॉक डाऊन उलंघन असे स्ट्यम्प त्यांना मारण्यात येतील असे महाराष्ट्र पोलिस तर्फे सांगण्यात आले आहे .