भुकेल्यांना अन्न देण्याचा निर्धार…मूर्तिजापूर अग्रवाल युवकांचा स्तुत्य उपक्रम…

मूर्तिजापूर – राज्यात सर्वत्र संचारबंदी असतांना अनेक हातमजुरी करणारे गरीब कुटुंबावर उपासमारीची पाळी आहे.राज्य सरकार घोषणा जरी करीत असल तरी सरकार कडून प्रत्यक्षात मदतीचा ओघ येणे बाकी असल्याने.

तालुक्यातील हातमजुरी करणार्यांची मोठी पंचाईत झाली आहे ,यातच भुकेल्यांना अन्न या श्री संत गाडगे बाबा मंत्राला व सामाजिक बांधलीकी समजून मूर्तिजापूर तालुक्यातील कोणीही उपाशी राहू नये यासाठी अग्रवाल समाजातील युवकांनी पुढाकार घेत आहे.शहरातील गोरगरिबांना त्यांच्या ठिकाणी जाऊन भोजन वाटपाचा कार्यक्रम सुरू केलाय.

गेल्या चार पाच दिवसापासून उपाशी असलेल्या मूर्तिजापूर तालुक्यातील माना या गावाबाहेर असणाऱ्या पारधी वस्तीवर जाऊन अन्नदान केलं.

यात प्रामुख्याने सामाजिक कार्यकर्ते सतीश अग्रवाल,अश्विन अग्रवाल,चिंटू अग्रवाल,मनोहर निमोदीया,अंकित अग्रवाल,शुभम अग्रवाल,नितेश अग्रवाल ,अविन अग्रवाल,संजय अग्रवाल, प्रतीक भारुका या युवकांनी सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here