सरकारला कोरोनाचा सामना करण्यासाठी राहुल गांधींनी सुचवले हे पाच उपाय…वाचा

कोरोना विषाणूचा परिणाम भारतातही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आतापर्यंत देशात या विषाणूच्या ११०० हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, या महामारीचा सामना करण्यासाठी कॉंग्रेसकडून काही सूचना भारत सरकारला देण्यात आल्या आहेत. राहुल गांधींनी सुचवलेले हे उपाय कॉंग्रेसने आपल्या ट्विटरवर शेअर केले आहेत.

सोमवारी कॉंग्रेस पक्षाने ट्विटरवर लिहिले की, ‘कोरोना साथीचा रोग गंभीर स्थितीत पोहोचला आहे. परंतु, यामुळे घाबण्याऐवजी सुज्ञतेने वागण्याची गरज आहे. सरकारने सामरिक पातळीवर सामोरे जाण्याची गरज आहे. या ट्विटसह काही सूचनाही शेअर केल्या गेल्या.

– सामाजिक सुरक्षा मजबूत करा, प्रत्येक सार्वजनिक स्त्रोत वापरा.

– कष्टकरी गरीबांना मदत आणि निवारा द्या.

– बेड आणि व्हेंटिलेटरने सुसज्ज हॉस्पिटलची स्थापना.

– आवश्यक उपकरणांचे उत्पादन.

– वास्तविक परिस्थिती शोधण्यासाठी चौकशी वाढवा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here