भडगांव तालुक्यातील निभोरा येथे गिरणा नदीपात्रातुन अवैध वाळु चोरी…महसुल प्रशासनाचे दुर्लक्ष…निभोरा ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंचाने पकडले अवैध वाळु चोरी करतांना ट्रॅक्टर…

भडगांव प्रतिनिधी :- देशा सह राज्यात कोरोनाने थैमान घातले असतांना मात्र भडगांव तालुक्यातील निभोंरा येथील गिरणा नदीपात्रात रात्रीच्या वेळेस सर्रासपणे अवैध वाळु चोरी केली जाते.

या बाबत निभोरा ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच दिलीप मन्साराम पाटील व ग्रामस्थ यांनी ट्रॅक्टर व्दारे अवैध वाळु चोरी करुन घेऊन जात असतांना विना नबंर चे ट्रॅक्टर पकडुन भडगांव महसुल प्रशासनाच्या ताब्यात दिले आहे.

या बाबत भडगांव तहसिलदार यांना तोंडी सांगुन ही या कडे महसुल प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे.

याबाबत सविस्तर असे की भडगांव तालुक्यातील निभोरा येथील गिरणा नदी पात्रातुन रात्रीच्या वेळी सर्रासपणे अवैध वाळु चोरी केली जाते यामुळे नदीपात्रात मोठ मोठे खड्डे पडले आहे याबाबत वाळु चोरीला कुठेतरी आळा बसायला पाहिजे त्यांच्यावर कारवाई होय ला पाहीजे म्हणुन निभोंरा ग्रामपंचायतीचे सरपंच दिलीप मन्साराम पाटील यांनी भडगांव तहसिलदार माधुरी आंधळे यांच्याकडे तोंडी तक्रार केली होती

याबाबत तहसिलदार आंधळे यांनी सांगितले तुम्ही वाळु चोरी करतांना ट्रॅक्टर दिसले की ते पकडुन ठेवा व मला फोन करा असे सांगितले. म्हणुन ग्रामपंचायत सरपंच व ग्रामस्थ यांनी काल दि.१ एप्रिल रोजी रात्री १वाजता निभोरा येथे अवैध चोरी करुन जातांना ट्रॅक्टर पकडले व तहसिलदार आंधळे यांना सरपंच यांनी फोन केला असता त्यांनी त्यांचा रात्रभर फोनच उचलला नाही.

यावरून लक्षात येते की भडगांव तहसिलदारांसह महसुल प्रशासन अवैध वाळू चोरी बाबत किती गांभीर्याने दुर्लक्ष करीत असल्याचे निभोरा येथील सरपंच लोकनियुक्त संरपंच दिलीप मन्साराम पाटिल यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here