भडगांव प्रतिनिधी :- तालुक्यातील वडगांव बु. ग्राम पंचायत हद्दीतील नगरदेवळा रेल्वे गेटवस्ती येथे आज पोलीस पाटील विजय राजपुत व सरपंच पती दिपक माळी यांनी मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे यांनी टाकलेल्या धाडीत दहा हजार रुपयाची अवैध दारू बनवण्याचे रसायन नष्ट व गावठी हातभट्टी उध्वस्त करण्यात आली.
वडगांव बु. शिवारातील नगर देवळा रेल्वे गेट येथे तितुर नदी काठा जवळ हातभट्टी दारू तयार केली जात होती. तसेच वस्तीमध्ये अवैध दारू विक्री केली जात असल्याची माहीती वडगांव बुI पोलीस पाटील विजय मदनसिंग राजपुत यांना मिळाली होती. पोलीस पाटील विजय मदनसिंग राजपुत व सरपंच पती दिपक रतन माळी यांनी
माहीतीच्या आधारे नुकतेच या ठिकाणी जाऊन छापा टाकला.
गावठी हातभट्टीची दारू आणि कच्चे रसायन दारू तयार करण्यासाठी लागणारी साधने, ९ते१० टाक्या. एकूण दहा हजार रुपये किमतीचा माल नष्ट करण्यात आला. या कारवाईसाठी नगरदेवळा रेल्वे गेट येथील ग्रामस्थांनी ही सहकार्य केले