भटक्या कुटुंबाला दिले वन कर्मचाऱ्यांनी जगण्याचे बळ…लॉकडाऊनमुळे बसला आर्थिक फटका

भंडारा : फळे बनवून विकण्याचा व्यवसाय करण्याकरिता भटक्या जमातीचे कुटुंब भंडारा नजीक राहून पोटाची खळगी भरत होते. मात्र, कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने सर्वांवरच संकट कोसळले आहे.

हीच परिस्थिती आमगाव येथील भटक्या जमातीच्या कुटुंबावर ओढविले. याची माहिती होताच वन कर्मचारी तथा स्वस्त धान्य दुकानदार यांनी त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांना जीवन जगण्याचे बळ दिले.

◆ आमगांव येथे भटक्या जमातीचे लोक कामाकरिता आले होते. ते फळे तयार करून त्याची भंडारा व लाखनी येथे विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांना आपल्या झोपडी वजा तंबूच्या घरातून बाहेर पडणे आता बंद झाले. त्यामुळे आर्थिक संकट त्यांच्यावर ओढविले. त्यामुळे त्याच्या रोजच्या जेवणाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.

ही माहिती होताच अभयरण्य एन एन टी आर चे वनरक्षक तुकाराम डावकोरे, भंडारा प्रादेशिक वनरक्षक निलेश श्रीरामें यांनी त्यांना राशन घेऊन दिले होते. हे राशन संपल्याची माहिती तुकाराम डावकोरे, निलेश श्रीरामें यांना मिळाली.

◆ त्यांनी पुढाकार घेऊन सदर भटक्या कुटुंबाला १५ दिवस पुरेल एवढे राशन घेऊन दिले. त्यात आमगांव येथील स्वत धान्य दुकान मालक देवानंदभाऊ चौधरी यांनी स्वमर्जीने २० किलो तांदुळ मोफत दिले. यासोबत श्री डावकोरे व श्री श्रीरामे यांनी तेल, बेसन, मिर्ची पावडर, डेटॉल साबुन, निरमा साबुन,

आठ दिवस पुरेल एवढा भाजीपाला घेऊन दिला. तसेच आपल्या गावात शहरात कोणी लॉकडाऊनमुळे उपासी असेल कोणाच्या जेवणाची व्यवस्था होत नसेल तर त्याची माहिती आम्हाला कळवा त्यांच्या जेवणाची व राशनची व्यवस्था करण्यात येईल, असे आवाहन डावखोरे, श्रीरामे आणि चौधरी यांनी केली आहे. या मदतीने त्या कुटुंबांनी आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here