बुलढाण्यात आणखी दोघे पोजिटिव्ह आढळले..राज्याचा आकडा २२५ वर…

सचिन पाटील ,शेगाव /बुलढ़ाणा

राज्यातील करोना बाधित रुग्णांचा आकडा थांबायचं नाव घेत नाही आहे. मंगळवारी आरोग्य विभागानं जारी केलेल्या आकडेवारी नुसार राज्यात आणखी नवीन पाच करोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. यात मुंबईत १, पुण्यात २ तर बुलढाण्या २ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं असल्याने राज्याचा आकडा २२५ वर गेला आहे.

बुलढाणाजिल्हा रुग्णालयात दि,28/3/2020रोजी भर्ती केलेले शे,उमर दराज वय 46 वर्ष यांचा 29/3/2020 रोजी रविवारी मृत्यू झाला असून काल त्याच्यावर बुलढाणा येथे अंत्य संस्कार करण्यात आले ,आणि काल त्यांच्या परिवारातील व संपर्कातील 60 जणांना आइसोलेटेड वार्ड मद्धे भर्ती करण्यात आले होते ,

त्यातील 34 जणांचे स्यब सैंपल नागपुर येथे तपासणी करिता पाठविले होते , त्यापैकी20 जणांचे निगेटिव रिपोर्ट प्राप्त झाले ,बाकी 12 व्यक्तीचे राहीले होते,

त्यातील दोनजनाचे रिपोर्ट आता प्राप्त झाले असून ,ते पोजिटिव्ह आले आहेत ,अशी माहिती बुलढ़ाणा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रमचंद पंडित यानी सांगितले, त्यामुळे बुलढाणा करांची चिंता वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here