बीड जिल्ह्याचा विकासनिधी इतरत्र जाऊ देणार नाही…जिल्ह्यासाठी टोकाची भूमिका घेण्यासही मागे पुढे पाहणार नाही…धनंजय मुंडे

बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई : बीड जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा निधीच काय जिल्ह्याच्या हक्काचा कोणत्याही विकास कामांचा निधी इतरत्र कोठेही जाऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

बीड जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्ते विकास कामांचा निधी लॉकडाऊनच्या काळात इतरत्र वळवण्यात आला असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, त्यानंतर ना. मुंडे यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

ना. मुंडे म्हणाले की, बीड जिल्ह्याच्या हक्काच्या विकासकामांच्या बाबतीत एक रुपयाही इतरत्र वळवू देण्याचा प्रश्नच येत नाही; उलट जिल्ह्यातील विकासकामाना गती देण्यासाठी अधिकचा निधी खेचून आणण्याची आपली भूमिका व क्षमता आहे. सध्या आपले प्राधान्य फक्त जिह्याला कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचवणे, दुर्दैवाने हे संकट आलेच तर त्याला मात देण्यासाठी सक्षम आरोग्ययंत्रणा तयार ठेवणे हे आहे.

जिल्ह्याच्या विकासासाठी कोणतीही तडजोड करण्यात येणार नाही, त्यासाठी टोकाची भूमिका घेण्यासही आपण मागे पुढे पाहणार नाही असे स्पष्ट करतांना त्याचा प्रत्यय जिल्ह्याला लॉक डाऊन संपताच येईल असे मुंडे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here