प्रवाशांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकचालकांविरुद्ध कारवाई ! ३५ परप्रांतीय कामगार सुरक्षित…

हिंगणघाट
संपूर्ण भारतात लॉकडाऊन सुरू असतानाही असंख्य परप्रांतीय मजूरांचे आपल्या गावाकड भीतीने पलायन सुरू असून आज सकाळी ८ च्या सुमारास येथील राष्ट्रीय महामार्गावर परप्रांतीय मजूर बसवून घेऊन जाणारा एक कंटेनर (क्र. M H 04 –8498) व एक ट्रक ( M P07-G A2858) या दोन वाहनातून अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांची तपासणी राष्ट्रीय महामार्गावर तैनात असलेल्या पोलिसांनी केली असता त्यांना या वाहनात काही व्यक्ती बसलेल्या आढळून आल्या.

या दोन्ही वाहनांना पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आले व त्यातून 35 मजूरांना ताब्यात घेण्यात आले.या सर्व मजुरांना तात्पुरता येथील मोहता विद्ध्यालयात आश्रय देण्यात आलेला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार,आज सकाळी ८ च्या सुमारास एक कंटेनर नांदगाव चौरस्ता येथे तर एक ट्रक उपजिल्हा रुग्णालय चौक येथे उभे असून या दोन्ही वाहनात काही महिला व पुरुष बसले असल्याची माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या परिसराची नाका बंदी करून या दोन्ही वाहनांना हिंगणघाट पोलिस स्टेशन येथे आणण्यात आले.या दोन्ही वाहनात २५ पुरुष व ७ महिला आढळून आल्या.

या वाहनांच्या दोन्ही ड्रॉयव्हरने आपल्या वाहनात लोकांना बसवून शासनाचे कोरोना विषाणू संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या संचारबंदी आदेशाचे उल्लघन करून व चेहऱ्यावर मास्क न लावता व सुरक्षित अंतर न ठेवता मानवी जीवित व सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करून संसर्ग पसरविण्याची घातक कृती व अवैध प्रवाशी वाहतूक करून शासनाचे आदेशाचे पालन न केल्याने

हैद्राबाद वरून नागपूर कडे जानाऱ्या आयसर वाहनाचा चालक रशीद खान पशु खान ( वय 34)ग्वाल्हेर,व कंटेनर चा चालक सोनविरसिंग होमराजसिंग चौधरी ( वय 30) रा धरमपुर कला ( मुरादाबाद) मध्यप्रदेश यादोन्ही वाहन चालकविरुद्ध भांदवी कलम 188,269,271 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम 2, 3, 4,साथीचे रोग अधिनियम 1897,कलम 136 बीपी ऍक्ट,महाराष्ट्र कोव्हिडं 19 उपाय योजना नियम 1

1 इत्यादी विविध कलमा खाली गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
या सर्व कामगारांना एका शाळेत ठेवण्यात आले असून विविध संस्था व संघटनेच्या वतीने त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
याप्रकरणी पोलीस ठाणेदार सत्यविर बंडीवार यांचे नेतृत्वात पो हवालदार बंडू महाकाळकर,शैलेंद्र चाफलेकर पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here