पोषणआहार योजने अंतर्गत शिल्लक धान्यचे गरजुंना त्वरित वाटप करावे…शशिकांत उर्फ बाळू धुमाळ यांची मागणी…जिल्हाधिकारी यवतमाळ, उप विभागीय अधिकारी राळेगाव यांना निवेदन…

अक्षय काळे
राळेगाव

कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे नागरिकांना घरी राहण्याचे आदेश आहे.ही महामारी रोखण्याकरिता हा प्रभावी उपाय सर्वत्र अवलंबन्यात येत आहे. मात्र या मुळे रोजगार, मजुरी बंद झाल्याने गोरगरीब नागरिकांनसमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. शासनाने अशा वेळी शाळेतील पोषण आहार योजने अंतर्गत शिल्लक धान्य वितरित करण्याचा महत्वाकांशी निर्णय घेतला.

तालुक्यातील सर्व शाळांनी याचे पालन करून गोरगरीब व गरजुंना धान्यादी जिन्नसांचे नियमनानुरुप त्वरित वाटप करावे अशी मागणी शशिकांत उर्फ बाळू धुमाळ यांनी केली आहे. उप विभागीय अधिकारी राळेगाव यांना या बाबत निवेदन देण्यात आले.

शिक्षण संचालक यांनी 27 मार्च ला या बाबत आदेश निर्गमित केले मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ यांनी 30 मार्च रोजी या आदेशाची अंमलबजानी करण्याचे निर्देश दिले आहे.आसरा सामाजिक संघटनेद्वारे गोर-गरीब व गरजू नागरिकांना जीवनोपयोगी वस्तू, आरोग्य सेवा, या सह संकटात सापडलेल्या प्रत्येक नागरिकांना मदत देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

तालुक्यातील कोणताही नागरिक उपासी राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल अशी भूमिका घेऊन आसरा संघटन काम करीत आहे.शेकडो नागरिक मदतीच्या प्रतीक्षेत आहे. अशा वेळी शासनाने संचारबंदीच्या काळात पोषण आहार योजने अंतर्गत शिल्लक राहिलेल्या तांदूळ, डाळ, व कडधान्य वितरित करण्याचा चांगला निर्णय घेतला.

याची तातडीने अंमलबजानी करावी व शासन या संकटाच्या वेळी गरजूंच्या सोबत भक्कमपणे उभे आहे हा आस्वस्त करणारा संदेश द्यावा अशी मागणी शशिकांत उर्फ बाळू धुमाळ यांनी केली आहे.विशेष म्हणजे या कठीण प्रसंगी राळेगाव येथील नागरिकांना सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून देण्याकरिता आसरा संघटन द्वारे प्रामाणिक प्रयत्न करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया जनतेतून वेक्त होतं आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here