बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई : कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक उपाय योजनेकरिता मुख्यमंत्री निधीस सहाय्यता करण्याचे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात येत आहे.
या आवाहनाला सर्वच स्तरातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत होत आहे. याचाच भाग म्हणून सामाजिक भान जपत मेहा ता. कारंजा लाड जिल्हा वाशीम येथील पोलीस पाटील शीतल कडू यांनी देखील पुढाकार घेऊन आपले एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले आहे.
आज देशावर ओढवलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी सर्वानी पुढे येणे गरजेचे आहे. संपूर्ण देश आज लॉक डाऊन आहे म्हणुन घरी बसा आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या stay home असे आवाहन शीतल कडू यांनी केले