पोलीस-डॉक्टर्स आपल्यासाठी जीव धोक्यात घालून अहोरात्र उभे…त्यांचा सन्मान करा…सनदी लेखापाल सचिन सातपुते

बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई :- सर्वत्र लॉकडाऊन च्या परिस्थितीत पोलीस, डॉक्टर्स, नर्स, शासकीय कर्मचारी हे अहोरात्र जनतेची काळजी घेण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत, त्यांचा सन्मान करा, नियमांचे पालन करा असे आवाहन सनदी लेखापाल सचिन सातपुते यांनी केले आहे.

लॉकडाऊन मध्ये बाहेर पडलेल्या काही जणांना पोलिसांच्या लाठीचा सामना करावा लागला, काही ठिकाणी तर नागरिकांनी पोलिसांशी वाद घातल्याचेही प्रकार घडले,

पोलीस, डॉक्टर्स, नर्स, शासकीय अधिकारी – कर्मचारी हे सर्वजण अहोरात्र आपला जीव धोक्यात घालून या संकटाशी सामना करण्यासाठी काम करत आहेत. त्यांचा मान सन्मान करावा, त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा विचार करावा, कायद्याबाबत आदर ठेवावा व शासकीय सूचनांचे काटेकोर पालन करावे हे सर्वकाही जनतेच्या हिताचेच आहे, कोरोना विषाणूचा सामना घरात राहून व संसर्ग होण्यापासून रोखणे यातूनच केला जाऊ शकतो असे सचिन सातपुते यांनी म्हटले आहे.

अफवांना बळी पडू नका, अफवा पसरवणाऱ्याविरुद्ध कारवाई होणार
दरम्यान जिल्ह्यासह राज्यात कोरोनाच्या भीतीसह सोशल मीडियावर अफवांचे पेव फुटले आहेत. कोरोना विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेता कोणतीही अनधिकृत माहिती पसरवू नये असे शासनाकडून वारंवार सूचित करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here